दक्षिणा भवन

 

कागदोपत्री संस्थेच्या अनेक योजना असून त्या पुरेशा निधीच्या प्रतीक्षेत आहेत. दक्षिणा भवन ही त्यापैकी सर्वांत मोठी योजना. संस्थेला सरकारकडून दहा हजार चौ. फूट जागा (जमीन) पुण्यात चांदणी चौकाजवळ मिळाली आहे. परंतु निधी अभावी इमारत उभी राहू शकलेली नाही.

मराठी व महाराष्ट्रप्रेमी दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे अशी विनंती आहे.

नियोजित इमारतीत एक सभागृह विद्यार्थांसाठी अभ्यासिका, पुण्याबाहेरून येणार्‍या साहित्यिकांसाठी खोल्या, ग्रंथालय यांचा समावेश असेल.

 

इमारतीच्या नकाशात आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो.