संस्थेकडे असलेला अमूल्य वाङ्मयीन ठेवा

  • सन १८९४ पासूनची मराठी ग्रंथांची विद्वानांनी केलेली परीक्षणे
  • शंभर वर्षांपूर्वीपासूनचे जुने, दुर्मीळ ग्रंथ; एकूण ग्रंथसंख्या ६००० पेक्षा अधिक
  • पेशवे दप्तर: शाहू महाराज गादीवर आले तेव्हापासून खडकीच्या लढाईपर्यंत म्हणजे सुमारे ११० वर्षांचा मराठेशाहीचा इतिहास यांत पाहावयास मिळतो. या काळात महाराष्ट्रात सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थिती कशी होती, लोकांची करमणूकीची साधने कोणती होती, राज्यव्यवस्था कशी होती, शेतसा-याची आकारणी व वसूली कशी होत असे, मिठावरील कराविषयी माहिती, सरकार कर्ज कसे काढी व कसे फेडी, दिवाणी व फौजदारी खटले कसे चालत, पोलीस, टपाल, टांकसाळ, धर्मादाय, सडका, औषधोपचार वगैरेची व्यवस्था कशी होती, यांविषयी बरीच व विश्वसनीय माहिती या दप्तरांत मिळते.
  • पेशवे रोजनिशा
  • न्यायमूर्ती रानडे यांचा पत्रव्यवहार
  • सन १८२५ पासून प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची १८९६ - ९७ मध्ये तयार केलेली हस्तलिखित ग्रंथसूचि
  • ३२ प्रकारचे कोश, जुन्या पोथ्या
  • विविध विषयांवरील ३० अभ्यासपूर्ण प्रबंध (हस्तलिखित स्वरूपात)
  • शंभर वर्षापूर्वीचे काही हस्तलिखित ग्रंथ