संस्थेचे कार्य

  • मराठी भाषेत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचे परीक्षण करून उत्कृष्ट पुस्तकांना पारितोषिक देऊन त्या पुस्तकांच्या लेखकांना प्रोत्साहित केले.
    काही प्रमुख लेखक व त्यांची पुस्तके:
    लेखक पारितोषिक प्राप्त पुस्तक
    हरि नारायण आपटे   गड आला पण सिंह गेला
    ना. गो. चापेकर पैसा आणि विनिमयाचे साधन
    न. चि. केळकर सुभाषित आणि विनोद
    पां. वा. काणे भारत, रामायणकालीन समाजस्थिती
    वा. गो. आपटे मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी
    माधवराव पटवर्धन फारशी मराठी कोश
    श्री. म. माटे विज्ञान बोध
    श्री. रा. टिकेकर लोकहितवादींची शतपत्रे
    शं. गो. तुळपुळे यादवकालीन मराठी भाषा
    सिद्धेश्वरशास्त्री चित्राव अर्वाचीन चरित्र कोश

    पारितोषिकांसाठी ग्रंथ निवडताना स्वतंत्र आणि नवीन विचार, तर्कशुद्ध मांडणी, प्रौढ भाषा इ. निकषांचा विचार केला जातो.

  • जुन्या दुर्मीळ कागदपत्रांचे जतन: या कार्यासाठी शासनाकडून आतापर्यंत एक लाख रूपये अनुदान मिळाले असून त्यातून न्या. रानडे यांचा पत्रव्यवहार व अन्य महत्त्वाची कागदपत्रे लॅमिनेशन करून ठेवली आहेत.
  • मराठी भाषेविषयी मराठी मुलांतच अज्ञान दिसून येते. हे लक्षात घेऊन मराठी मुलांना मराठी भाषेची ओळख व्हावी, भाषा शुद्ध बोलता व लिहिता यावी यासाठी दरमहा संस्थेतर्फे ‘भाषा-पत्र’ प्रसिद्ध करण्यात येत होते. हीच मासिक भाषापत्रे एकत्र करून संस्थेने त्यांची एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे.
  • पुण्यातील वनाझ कंपनीचे पूर्वीचे मालक कै. सं. कै. खांडेकर यांच्याकडून जिल्हाधिकारी, पुणे यांच्यामार्फत संस्थेने दहा हजार चौरस फूट जमीन देणगीच्या स्वरूपात मिळवली असून त्या व्यवहारावर शासनाचे शिक्कामोर्तब झाले आहे.
  • सन १८२५ ते सन १९२५ या कालावधीत मराठी भाषेत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची विषयानुक्रमाने संगतवार यादी संस्थेने केली आहे.
  • संस्थेने १९५१-५२ साली ग्रंथ प्रकाशनाची नवीन योजना तयार केली.
  • सन १९७३ पासून दक्षिणा पारितोषिक प्रबंध स्पर्धा संस्थेने सुरू केली. या योजनेतून आतापर्यंत ३० प्रबंध संस्थेच्या संग्रही जमा झाले आहेत.